Sunday, 19 August 2018

'दंगल' फेम झायराची इन्स्टावर 'डिप्रेशन' पोस्ट

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

दंगल' फेम झायरा वसिमने इन्स्टाग्रामवर 'डिप्रेशन' पोस्ट केली आहे. यामध्ये आपण गेल्या 4 वर्षापासून नैराश्यग्रस्त जीवन जगत आहोत. तसेच अशा परिस्थितीशी मी लढण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. लढत असताना मला अनेकांनी अनेक प्रकारचे सल्ले दिले. डिप्रेशन फक्त एक आयुष्याचा वाईट टप्पा आहे. तो प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतो. आपण त्याचा सामना केला पाहिजे. नैराश्य येण्यासाठी तु फारच तरुण आहेस आणि हे दिवस सुध्दा जातील असं सांगत मला सावरण्याचा प्रयत्न केला असं झायराने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. माझ्यावर अशी परिस्थिती येईल अशी मी कधी कल्पनाही केली नव्हती. अनेक नकारात्मक विचारांनी मनात घर केलं आहे. झोप न येणं, जेवन न जाणं, कधी-कधी भरपून खाणं, अंगदुखी, आत्महत्या करण्याचा विचार मनात येणं अशा अनेक गोष्टी या टप्प्यात मी पाहत आहे. मला अजूनही आठवतंय की वयाच्या 12 व्या वर्षी मला नैराश्याचा झटका आला होता. पण या परिस्थितीशी लढण्याचा मी संकल्प केला असल्याचं झायराने पोस्टमध्ये स्पष्ट केलं आहे.

loading...

Top 10 News

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Sun Aug 19 14:33:51 +0000 2018

25 दिवसात 9,100 किमी अंतर अमित समर्थ यांचा सायकलिंगचा रेकॉर्ड थेट जपानहून अमित समर्थ पाहा बातमी आणि बरंच काही ... 8… https://t.co/uIcG4gLMrR
Jai Maharashtra News
Sun Aug 19 13:59:37 +0000 2018

औदुंबराचं तीर्थ... औदुंबराच्या वृक्षातून वाहतंय पाणी ! या मागचं नेमकं रहस्य काय ? चमत्कार की आणखी काही ? जाणून घे… https://t.co/6hAyQo0qL0

Facebook Likebox