Tuesday, 22 May 2018

'रेस 3' चा खलनायक हा......

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्युज, मुंबई

एका वर्षाला एकच चित्रपट करायचा त्यानंतर जगभर फिरायला जायचे, हे बॉबी देओलने अनेक वर्ष केलय. मात्र त्याच्या या चक्रात हिंदी चित्रपटसृष्टीचं त्याला विसरुन गेलीय. मग फिरुन फिरुन तरी किती वर्ष फिरणार... शेवटी, काम ते कामच आणि ते करावं तर लागणारच, मात्र तुम्हाला जेव्हा काम पाहिजे, तेव्हा खरच काम उपलब्ध असते काय ? त्याचे उत्तर कोणीच देऊ शकत नाही. म्हणुन की काय, बडे भय्या सन्नी देओल ला, बॉबीला कोणी तरी काम दया असे भाऊक आव्हान करावे लागलं. त्या आवाहनाला जागुन, सलमान खान यानं, त्याची शिफारस 'रेस 3' या चित्रपटासाठी केली.

'बरसात' या चित्रपटापासुन अभिनय कारकीर्दीची सुरवात करणारा बॉबी देओल, अनेक वर्ष हिरो म्हणुन खलनायकाला बडवत राहीलाय. आता मात्र 'रेस 3' या चित्रपटात तो सलमान खान समोर खलनायक म्हणुन उभा राहणार आहे. 15 जुन रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'रेस 3' चे दिग्दर्शन रेमो डीसोजा यांनी केलं आहे.

'रेस 1 आणि 2' मध्ये सैफ अली खान आणि दिग्दर्शक अब्बास मस्तान ही सामाईक ऩावं मात्र 'रेस 3'मधुन वगळली गेली आहेत. या बदलाला, प्रेक्षकवर्ग कश्याप्रकारे घेतो त्याकडे ट्रेड पंडितांचे लक्ष नसल्यास नवल...

loading...

Top 10 News

Facebook Likebox

Popular News

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Mon May 21 15:59:22 +0000 2018

दंगलकारण... ग्राऊंड झिरो... https://t.co/FFhWkNrpjw
Jai Maharashtra News
Mon May 21 15:57:26 +0000 2018

फेरीवाल्यांचा फेरा... https://t.co/afKg0YkRmr