Sunday, 19 August 2018

एक निरागस आणि तरल प्रेमकहाणी 'सोबत' या चित्रपटातून उलगडणार

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्युज, मुंबई

प्रेम हा विषय आजवर हिंदी-मराठी चित्रपटांतून असंख्यवेळा हाताळलेला विषय आहे. तरीही, या विषयावर नवनवे चित्रपट तयार होतात. प्रेमाचे वेगळे कंगोरे, काळानुरूप बदलणाऱ्या नातेसंबंधांचा शोध या चित्रपटातून घेतला जातो. अशीच एक निरागस आणि तरल प्रेमकहाणी 'सोबत' या चित्रपटातून उलगडणार आहे. आपल्या आजुबाजूला घडणारा ताजा विषय मनोरंजक पद्धतीनं या चित्रपटात मांडण्यात आला आहे.

अल्पवयीन प्रेमाचा शोध हा चित्रपट घेणार आहे. कश्मिरा फिल्म्स प्रोडक्शन्स निर्मित, गुरुनाथ मिठबावकर यांची प्रस्तुती असलेला "सोबत"हा चित्रपट 25 मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पाठशाला, हमने जिना सिख लिया, डेहराडून डायरी, हनुमान असे बरेच हिंदी चित्रपट दिग्दर्शित केलेल्या मिलिंद उके यांनी'सोबत' दिग्दर्शित केला आहे. त्यांनी आपल्या प्रत्येक चित्रपटातून वेगळा विषय हाताळला आहे. त्यामुळे "सोबत" या चित्रपटाचाही त्याला अपवाद ठरणार नाही.  

'सोबत'मध्ये नव्या-जुन्या कलाकारांचा कसदार अभिनय पहायला मिळणार आहे. हिमांशू विसाळे आणि मोनालिसा बागल ही फ्रेश जोडी या चित्रपटात आहे.

loading...

Top 10 News

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Sun Aug 19 14:33:51 +0000 2018

25 दिवसात 9,100 किमी अंतर अमित समर्थ यांचा सायकलिंगचा रेकॉर्ड थेट जपानहून अमित समर्थ पाहा बातमी आणि बरंच काही ... 8… https://t.co/uIcG4gLMrR
Jai Maharashtra News
Sun Aug 19 13:59:37 +0000 2018

औदुंबराचं तीर्थ... औदुंबराच्या वृक्षातून वाहतंय पाणी ! या मागचं नेमकं रहस्य काय ? चमत्कार की आणखी काही ? जाणून घे… https://t.co/6hAyQo0qL0

Facebook Likebox