Tuesday, 22 May 2018

यशराजच्या 'समशेरा' या चित्रपटात रणबीर कपुरची वर्णी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्युज, मुंबई

'रॉकेट सिंग सेल्समन ऑफ द इअर' या चित्रपटापासुन, रणबीर कपुरने यशराज फिल्म बरोबर काम करायला सुरवात केली. मात्र तो चित्रपट आपटल्यावर त्या दोघांनी अनेक वर्षाची फारकत घेतली होती. त्यानंतर त्यांना 'बचना ये हसीनो 'या चित्रपटात एकत्रित पाहता आले. 'बचना... या चित्रपटाला साधारण यश मिळाल्यावर, तब्बल नऊ वर्षानंतर रणबीर कपुर, यशराज फिल्मबरोबर काम करत आहे. 'देसी', 'मसाला ऐन्टटेनर',  'मेगा ऍक्शन' असलेल्या या चित्रपटाचे नाव आहे 'समशेरा'. करण मल्होत्रा बरोबर यशराज फिल्मचा असलेला तिन फिल्मच्या करारा अंतर्गत समशेराचे काम होणार आहे. 'अग्नीपथ', 'ब्रदर्स' या चित्रपटानंतर, 'समशेरा' हा करणचा तिसरा चित्रपट असणार आहे. 

हिंदी सिनेमा पाहताना, मला जे काही आडवतं किंवा जे काही काम करायचे आहे ते मला 'समशेरा' या चित्रपटात करता येईल हि जाणीव आल्याने मी चित्रपट स्विकारल्याची माहीती रणबीर कपुरने दिली. हिरोने कसं काम करायचे, ते कोठेतरी माझ्या मनात होते. आणि नेमकं तेच मला 'समशेरा' या चित्रपटात करायला मिळणार आहे. करण मल्होत्रा मला माझ्या कम्फर्ट झोनमधुन बाहेर काढुन, एका आव्हानात्मक झोनमध्ये टाकणार असल्याची पूरक माहीती रणबीर देतो.

भारताच्या मातीमध्ये घडणाऱ्या या कथानकामध्ये अचंभीत करणारी ऍक्शन असुन त्यात कधीही न पाहिलेल्या अवतारात रणबीर कपुर दिसणार आहे. या वर्षाच्या शेवटी 'समशेरा' या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरवात होईल आणि पुढील वर्षी उन्हाळ्या दरम्यान चित्रपटाचे प्रदर्शन होईल.

loading...

Top 10 News

Facebook Likebox

Popular News

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Mon May 21 15:59:22 +0000 2018

दंगलकारण... ग्राऊंड झिरो... https://t.co/FFhWkNrpjw
Jai Maharashtra News
Mon May 21 15:57:26 +0000 2018

फेरीवाल्यांचा फेरा... https://t.co/afKg0YkRmr