Thursday, 15 November 2018

माधुरी दिक्षितच्या बॅकेट लिस्टमध्ये आता तोही....

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्युज, मुंबई

मोहक हास्य आणि तितक्याच कसदार अभिनयानं प्रचंड मोठा चाहतावर्ग निर्माण करणाऱ्या 'धकधक गर्ल' अर्थात, माधुरी दिक्षित अभिनीत बकेट लिस्ट या चित्रपटाद्वारे माधुरी मराठी चित्रपटसृष्ट्रीत पदार्पण करत आहे. या चित्रपटाची खासीयत येथेच संपत नाही तर त्यामध्ये माधुरीबरोबर पाहुण्या कलाकाराच्या भुमिकेत रणबीर कपुर देखील दिसणार आहे. आज या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला, त्या दरम्यान खुद्द माधुरीने या बातमीचा गौप्यस्फोट केलाय.

रणबीर कपुर अभिनीत, यह जवानी है दिवानी या चित्रपटात माधुरी ऐका गाण्यादरम्यान झळकली होती. त्या दरम्यान रणबीरच्या अभिनयक्षमतेने प्रभावित झालेल्या माधुरीने, रणबीरचे नाव बकेट लिस्ट या चित्रपटासाठी सुचवल्याचे तिने या कार्यक्रमादरम्यान जाहीर केले. 

या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये माधुरी एका वेगळ्याच अंदाजात दिसतेय. माधुरी हेल्मट आणि जॅकेट घालून बाइक चालवताना दिसतेय. ‘बकेट लिस्ट… माझी, तुमची… आपल्या सगळ्यांची,’ अशी या चित्रपटाची आकर्षक टॅगलाइन आहे. तेजस देऊस्करनं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन्सनं हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. ‘बकेट लिस्ट’ या चित्रपटातून माधुरी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार असल्यानं चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता असल्याचं दिसून येत आहे.
loading...

Top 10 News

राशी भविष्य