Monday, 23 July 2018

'बिग बॉस मराठी' मध्ये खंडोबा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मराठी प्रेक्षकांना उत्सुकता लागलीये आता ती 'बिग बॉस मराठी'ची. 15 एप्रिलपासून हा मराठी बिग बॉस प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचणार आहे. पण या बिग बॉस मराठीमध्ये कोण कोण कलाकार सदस्य म्हणून असणार हे अद्याप कळलेलं नाही. बिग बॉस हा कार्यक्रम प्रत्येक भाषेत लोकप्रिय ठरला आहे. आता मराठीत हा प्रेक्षकांना किती भावतो हे पाहण महत्वाचं ठरणार आहे.

बिग बॉस मराठीचं सूत्रसंचालन दिग्दर्शक महेश मांजरेकर करणार आहे. उषा नाडकर्णी यांच नाव आतापर्यंत समोर आलं आहे. मात्र अजून कुणाची नाव समोर आलेली नाहीत. असं म्हटलं जातं की जय मल्हार या मालिकेतून घराघरात पोहोचलेला चेहरा देवदत्त नागे या शोमध्ये असणार आहे अशी चर्चा आहे.
‘बिग बॉस’च्या वादग्रस्त घरात अभिनेता ललित प्रभाकर, प्राजक्ता माळी, गौरी सावंत या कलाकारांनी येण्यास नकार दिल्याचं म्हटलं जात आहे. असं असलं तरीही आता या घरात येणाऱ्या पहिल्या सेलिब्रिटीच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे. आता यापुढे आणखी कुणाची नाव समोर येतात हे पाहणं देखील महत्वाच ठरणार आहेत.

loading...

Top 10 News

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Mon Jul 23 05:05:04 +0000 2018

#हेडलाइन मेघा धाडे ठरली मराठी बिग बॉसच्या पहिल्या पर्वाची विजेती...हा विजय माझ्या चाहत्यांचा...विजयानंतर मेघाची पहि… https://t.co/vU9pPixXJd
Jai Maharashtra News
Mon Jul 23 05:03:24 +0000 2018

#हेडलाइन मुंबईतल्या धारावीत अल्पवयीन मुलाचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप...सायन हॉस्पिटलम… https://t.co/lilchBc8U0

Facebook Likebox