Wednesday, 15 August 2018

वरुण धवनच्या 'ऑक्टोबर'चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र, मुंबई

बॉलिवूड अभिनेता वरुण धवनच्या आगामी 'ऑक्टोबर' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. 2 मिनिट 23 सेकंदाचा ट्रेलर पाहून स्पष्ट आहे की, या सिनेमातील वरूणची भूमिका त्याच्या मागील सिनेमातील भूमिकेपेक्षा फारच वेगळी आहे. यामध्ये वरुणचा अंदाज निराळा आहे.

या सिनेमाचा दिग्दर्शक शूजित सरकार असून 13 एप्रिल रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक शूजित सरकार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, हा सिनेमा रोमांटिक नसून प्रेमावर उपस्थित केलेल्या प्रश्नांवर भाष्य करणारा आहे.

सिनेमातील चित्रपटातील ट्रेलरच्या सुरुवातीलाच वरुण धवन हॉटेलमधील वेटरच्या भूमिकेत दिसतोय. सिनेमातील व्यक्तिरेखा खरीखुरी वाटण्यासाठी वरुण एक आठवडा झोपला नाही. व्यक्तिरेखा पूर्णत: जिवंत वाटण्यासाठीच शूजित सरकारने त्याला असं करण्यास सांगितलं होतं.
या सिनेमात वरूणसोबत बानीता संधू दिसणार आहे.

 

loading...

Top 10 News

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Wed Aug 15 03:20:47 +0000 2018

स्वातंत्र्य दिनिमित्त लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण Live - https://t.co/0QV2oC1IMP… https://t.co/eyEHggPI9o
Jai Maharashtra News
Wed Aug 15 02:49:41 +0000 2018

लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींचे भाषण - https://t.co/CQeCJ1D8LR #पाहाJMLive https://t.co/UOt1k0mysA

Facebook Likebox