Wednesday, 20 June 2018

क्राइम शो ‘सावधान इंडिया’ होणार बंद

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई

लोकांच्या पसंतीस ठरलेला क्राइम शो ‘सावधान इंडिया’ अचानक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अद्याप चॅनल कडून हा कार्यक्रम बंद करण्याबाबत कोणत्याही प्रकारची घोषणा केली गेली नाही. सुत्रांच्या माहितीनुसार कार्यक्रम रातोरात ऑफ एयर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सावधान इंडिया हा कार्यक्रम, 8 वेगवेगळे प्रोडक्शन हाऊस चालवत होते. अचानक कार्यक्रम बंद होणार असल्याने कलाकार आणि क्रू मेंबर्सना मजबूत धक्का बसला आहे. हा शो सध्या सुशांत सिंह होस्ट करतोय. याआधी मोहनीश बहल, सिद्धार्थ शुक्ला, हितेन तेजवानी, पूजा गौर, शिवानी तोमर आणि दिव्या दत्ता यांनी होस्ट केला आहे. या शोचे प्रसारण आधी ‘लाइफ ओके’ चॅनलवर केले जात होते. गेल्यावर्षी 'लाइफ ओके' चॅनलला 'स्टार भारत' नावाने रिलॉन्च करण्यात आलं. त्यानंतर या चॅनलवर सर्व नवे शो होते, मात्र 4 वर्षांपासून चालत आलेला 'सावधान इंडिया' हा एकमेव शो दाखविला जात असे.

सुत्रांनुसार, हा कार्यक्रम बंद करण्यामागचं कारण यातील कथानक सादर करण्याच्या पद्धती वरून खूप तक्रारी येत होत्या. म्हणून हा शो थांबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. शहरांसोबत ग्रामीण भागांना जोडणाऱ्या कार्यक्रमांना पसंती देण्यात येत आहे.

loading...

Top 10 News

Popular News

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Tue Jun 19 14:03:18 +0000 2018

भाजपने पीडीपीसोबत युती तोडल्यानंतर मेहबुबा मुफ्तीचा राजीनामा... - https://t.co/hAp2bquJAq #BJPPDP #BJPDumpsPDP https://t.co/9cxhDu8I5f
Jai Maharashtra News
Tue Jun 19 13:30:10 +0000 2018

RT @pratham_tweet: >एटीएममधून आले पाचपट पैसे ! >खरेदीच्या बहाण्याने 'हार्ले डेव्हिडसन' घेउन फरार >खेळाडूंना घेउन जाणाऱ्या विमानाच्या इंजि…

Facebook Likebox