Monday, 17 December 2018

राधिका आपटेचा ट्रोलर्सना दणका

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र, मुंबई

बॉलिवूडमधील तारकांना त्यांच्या लुक्स आणि पेहरावामुळे अनेकदा सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येतं. नुकतचं राधिका आपटेला तिच्या बिकीनीमधील फोटोमुळे ट्रोल करण्यात आलं आहे.

बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडणारी मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटेने गेल्या आठवड्यात गोवा बीचवरचा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. या फोटोमध्ये राधिकाने बिकीनी घातली आहे, आणि तिच्या एका मित्रासोबत वाईन घेऊन रिलॅक्स करताना ती दिसतं आहे. राधिकाचा हा बिकीनीमधील बोल्ड फोटो काहीजणांना रुचला नाही. आणि तिला ट्रोल व्हावे लागले. मात्र राधिकानेही त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे

एकीकडे भारतीय महिलेची भूमिका साकारायची आणि दुसरीकडे बिकीनीमधील फोटो शेअर करायचे,  हे तुला शोभते का?असा सवाल राधिका आपटेला सोशल मीडियावरून विचारला होता. राधिकाने याला प्रत्युत्तर देत, मला ट्रोल केलं जातं याची मला कल्पना देखील नव्हती, याबाबत माझ्या मित्राने मला फोन करून माहिती दिली. हा फोटो बीचवरचा आहे आणि समुद्र किनाऱ्यावरील बीचवर कुणी साडी नेसून जाऊ शकत नाही. जर लोक बीचवर सुद्धा माझ्याकडून साडीची अपेक्षा धरीत असतील तर ती अपेक्षा माझ्याकडून धरू नका, असं ती म्हणाली. 

loading...

Top 10 News

राशी भविष्य