Monday, 17 December 2018

वडाली ब्रदर्स जोडीतील, प्यारेलाल वडाली यांचे निधन

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

 वृत्तसंस्था, अमृतसर

वडाली ब्रदर्स नावाने प्रसिद्ध असलेले प्यारेलाल वडाली यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं आहे. पंजाबमधील अमृतसर या ठिकाणी त्यांचे निधन झाले. ते 75 वर्षांचे होते.

पद्मश्री पूर्वचंद वडाली यांचे लहान भाऊ प्यारेलाल वडाली यांचं आज निधन झालं. प्यारेलाल हे गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. गुरूवारी प्यारेलाल वडाली यांची प्रकृती बिघडल्याने, त्यांना अमृतसरमधील फोर्टिस हॉस्पिटसमध्ये दाखल केले होते. आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले. प्यारेलाल वडाली हे सूफी गाण्यांसाठी प्रसिद्ध होते.

जगभरात आपल्या सूफी गाण्यांनी चाहत्यांना मंत्रमुग्ध करणारी वडाली ब्रदर्स यांची जोडी काफीया, गझल आणि भजन म्हणण्यातही  पटाईत होती. ‘ए रंगरेज मेरे’ आणि ‘इक तू ही तू ही’ या गाण्याला लोकांची खूप पसंती लाभली.

loading...

Top 10 News

राशी भविष्य