Friday, 14 December 2018

संजय दत्तला, फॅन कडून अनोखी भेट

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र, मुंबई

बॉलिवूड कलाकारांसाठी त्यांचे चाहते, आपलं त्यांच्याबद्दलचं प्रेम आणि आपुलकी निरनिराळ्या पद्धतीने व्यक्त करत असतात. अशाचं एका फॅनची सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. संजय दत्तच्या एका फॅन ने आपल्या सेफ डिपॉझिटमधील सर्व रक्कम  संजय दत्तच्या नावे केली आहे.

संजय दत्तची फॅन निशी त्रिपाठी यांचं 15 जानेवारी रोजी दिर्घ आजाराने निधन झालं. त्या 62 वर्षाच्या होत्या. त्यांच्या निधनानंतर काही दिवसांनी, त्यांचं मृत्यूपत्र परिवारासमोर वाचून दाखवण्यात आलं. या मृत्यूपत्राचं वाचन झाल्यानंतर, त्रिपाठी परिवाराला आश्चर्याचा जबर धक्का बसला आहे. कारण निशी त्रिपाठी यांनी आपली सर्व संपत्ती कुटुंबियांच्या नावावर न करता चक्क बॉलिवूड अभिनेता संजय दत्त यांच्या नावावर केल्याचं समोर आलं.

संजय दत्तला 29 जानेवारी 2018 ला पोलिसांनी फोन केला. पंधरा दिवसांपूर्वी निशी यांच निधन झालं असून त्यांनी आपल्या बॅंक खात्यातील रक्कम आणि बॅंक लॉकरमधील ऐवज तुमच्या नावे केली आहे, असे पोलिसांनी संजय दत्तला त्यावेळी सांगितले.

बँकेला लिहिलेली पत्रं समोर आल्यावर, निशी या संजय दत्तच्या इतक्या मोठ्या चाहत्या आहेत, हे त्रिपाठी कुटुंबालाही त्यांच्या मृत्यूनंतरच समजलं. कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्यानं निशी यांचं लॉकर उघडण्यात आलं नाही. निशींचा पैसा किंवा संपत्ती याच्याशी आपला काहीएक संबंध नाही, ती सर्व संपत्ती त्रिपाठी कुटुंबालाचं मिळायला हवी, असं संजय दत्तने आपले वकील सुभाष जाधव यांच्या माध्यमातून कळवलं आहे. संजय दत्तने यातील एका पैसाही घेण्यास नम्रपणे नकार दिला आहे

निशी यांनी मृत्यूच्या काही महिने आधी बॅंकेकडे नामांकन अर्ज दाखल केला होता. त्यामध्ये ‘फिल्मस्टार संजय दत्त’ असा उल्लेख असून त्याचा पाली हिलमधील पत्ता लिहिला आहे. त्रिपाठी कुटुंबाने याबाबत काही स्पष्टिकरण देण्यास नकार दिला आहे.

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य