Monday, 17 December 2018

जेष्ठ बॉलीवूड अभिनेत्री शम्मी कालावश

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र, मुंबई

जेष्ठ बॉलीवूड आणि टेलिव्हिजन अभिनेत्री शम्मी यांचं निधन झालं. त्या 89 वर्षाच्या होत्या. चित्रपटसृष्टीत त्यांचे मोलाचे योगदान असून 200 हून अधिक भूमिका त्यांनी साकारल्या होत्या.

1949 ते 1955 च्या काळात, शम्मी यांनी अनेक सिनेमांमध्ये मुख्य अभिनेत्री ची भूमिका पार पाडली. विनोदी भूमिकांसाठी त्या ओळखल्या जायच्या. छोट्या पडद्यावरील ‘देख भाई देख’, ‘जबान संभाल के’, ‘श्रीमान श्रीमती’, ‘कभी ये कभी वो’ आणि ‘फिल्मी चक्कर’ या सारख्य मालिकांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. ‘कूली नं 1’, ‘हम’, ‘गोपी किशन’, ‘हम साथ साथ है’ या सारख्या हिट सिनेमांमध्ये त्यांनी काम केले.

शम्मी यांचा जन्म 1931 मध्ये झाला असून त्यांचं खरं नाव नर्गीस रबदी असं आहे. शम्मी यांच्या निधनाने संपूर्ण बॉलीवूडमध्ये शोककळा पसरली आहे. महानायक अमिताभ बच्चन यांनी ट्विटरच्या माध्यामातून त्यांना श्रद्धांजली वाहिली. फॅशन डिझायनर संदीप खोसलानेही सोशल मीडियाद्वारे शोक व्यक्त केला.

loading...

Top 10 News

राशी भविष्य