Monday, 17 December 2018

सनी लिओनीने चाहत्यांना दिली ‘गुड न्यूज’

User Rating: 5 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Active
 

जय महाराष्ट्र, मुंबई

पॉर्नस्टार ते बॉलीवूड असा प्रवास करणारी अभिनेत्री सनी लिओनीने सर्वांना आनंदाची बातमी दिली आहे. आपल्या हॉट आणि बोल्ड अदाकारीने सर्वांना घायल करणारी सनी जुळ्या मुलांची आई झाली आहे.

मागील वर्षी तिने एक मुलगीही दत्तक घेतली होती. सनीने तिचं नाव निशा कौर वेबर ठेवले आहे. सनीनं, पती डॅनिअल वेबर आणि तीनही मुलांसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हि जुळी मुलं सरोगसीमार्फत जन्मले असल्याची माहिती सनीने दिली आहे.

अशर सिंह वेबर आणि नोरा सिंह वेबर अशी या चिमुकल्यांची नावे ठेवण्यात आली आहे. “देवाच्या इच्छेनुसार, 21 जून 2017 ला आम्हाला समजलं की, अल्पावधीच्या काळात आपण तीन मुलांचे पालक होऊ शकतो. खूप वर्षापासून कुटूंब वाढवण्याचा विचार आमच्या मनात होता. काही आठवड्यांपूर्वी आमच्या मुलांचा जन्म झाला. निशा, अशर, आणि नोआ यांच्या रुपाने, इतक्या वर्षांनी आमचं परिवार पूर्ण झाले आहे.” असे सनीने पोस्ट द्वारे आपला आनंद व्यक्त केला आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य