Sunday, 24 June 2018

साजशृंगाराने सजून ‘ती’ निघाली, अनंताच्या प्रवासाला

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

बॉलिवूडची लेडी सुपरस्टार श्रीदेवी यांच्या अंत्यसंस्काराला अखेर सुरुवात झाली आहे. अंतिम दर्शनासाठी श्रीदेवींचे पार्थिव मुंबईच्या सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबमध्ये ठेवण्यात आले होते. अंधेरी ते जुहू दरम्यान श्रीदेवीं यांची अंतयात्रा निघणार आहे. मुंबई विलेपार्ले येथील सेवा समाज स्मशानभूमीत श्रीदेवी यांचे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. श्रीदेवींच्या इच्छेप्रमाणे त्यांचे पार्थिव सफेद रंगाच्या फुलांनी सजवले आहे. तसेच, त्यांना सुवासिनीप्रमाणे सजवण्यात आले आहे. लाल रंगाची साडी, गजरा, मंगळसूत्र अशा विविध दागिन्यांनी त्यांनी सजवले आहे. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेच दिसून येतयं.

आपल्या मोहक अदाकारीने पडद्यावरील प्रत्येक भूमिका चोखपणे पार पाडणारी श्रीदेवी आज काळाच्या पडद्याआड गेलीय. आजही त्यांच्या चेहऱ्यावर तीच चमक, तेच तेज पाहायला मिळतयं. जणू अभिनयासाठीच त्यांचा शृंगार करण्यात आला आहे.

दरम्यान, लग्नसोहळ्यासाठी कुटुंबियांसह दुबईत गेलेल्या श्रीदेवींचा अकाली मृत्यू झाला. श्रीदेवींच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न उचलण्यात आले होते. तपासणीसाठी पती बोनी कपूर यांना दुबई सोडून जाण्यास मनाई केली होती. अखेर श्रीदेवी यांचा मृत्यू अपघाती असल्याचे स्पष्ट झाले. अन् दुबई पोलिसांकडून पती बोनी कपूर यांना क्लिन चीट देण्यात आली. 

loading...

Top 10 News

Popular News

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Sun Jun 24 02:00:00 +0000 2018

#सुविचार #शुभसकाळ #ThoughtOfTheDay #MotivationalQuote #suvichar #SundayMotivation #SundayThoughts… https://t.co/hsvwuUO4cz
Jai Maharashtra News
Sat Jun 23 16:33:36 +0000 2018

राजकीय विषयांवर अचूक भविष्यवाणी...पाहा राजमंत्र... https://t.co/3k97316Ve9 #Rajmantra #Astrology #Predictions

Facebook Likebox