Tuesday, 11 December 2018

फेसबुक लाईव्हमध्ये केले असे काही... अन्

User Rating: 3 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक पॅपोन याच्या विरोधात राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगात तक्रार दाखल झाली आहे. पॅपोनने लहान मुलांसोबत होळी सेलिब्रेशनचं फेसबुक लाईव्ह केलं होतं, ज्यामध्ये तो एका मुलीला किस करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे त्याप्रमाणे या लहान मुलीला अशा पद्धतीने किस करणं चुकीचं असल्याचा आरोप पॅपोनवर करण्यात आला आहे.

पॅपोन सध्या &TV वर प्रसारित होणारा सिंगिंग रिअॅलिटी शो ‘द व्हॉइस इंडिया किड्स’ च्या दुसऱ्या पर्वात जजच्या भूमिकेत आहे. शोच्या होळी स्पेशल एपिसोडच्या शुंटिंगनंतर व्हॅनिटी व्हॅनमध्ये मुलांसोबत सेलिब्रेशन करतानाचा व्हिडीओ फेसबुकवर पोस्ट करण्यात आला. हा व्हिडीओ पोस्ट होताच व्हायरल झाला. या व्हिडीओतील प्रकारावर सुप्रीम कोर्टातील वकील रुना भुयान यांनी आक्षेप घेतला आहे.

पॅपोनने अल्पवयीन मुलीसोबत जो प्रकार केला, तो अत्यंत वाईट आहे. हा व्हिडीओ पाहिल्यापासून या रिअॅलिटी शोमधील मुलांच्या सुरक्षेबद्दल चिंता वाटत असल्याचं रुना भुयान यांनी म्हटलं आहे. पॅपोन माझ्या मुलीसाठी वडिलधारी व्यक्ती आहे. यावर आमचा काहीही आक्षेप नाही. हा व्हिडीओ चुकीच्या पद्धतीने व्हायरल करण्यात आला आहे. माध्यमांनी हा व्हिडीओ दाखवू नये, अशी विनंती संबंधित मुलीच्या वडिलांनी केली आहे.

मुलांसोबत सेलिब्रेशन करत असताना पॅपोन एका मुलीला किस करताना व्हिडीओच्या शेवटी दिसत आहे. त्यानंतर पॅपोन फेसबुक लाईव्ह बंद करण्याचा आदेश देतो. &TV वरील या शोमध्ये पॅपोनसोबत हिमेश रेशमिया आणि शानही जजच्या भूमिकेत आहेत.

loading...

Top 10 News

राशी भविष्य