Wednesday, 20 June 2018

भाग्यश्रीच्या घरी चोरी करणारे ४ वर्षानंतर गजाआड

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

‘मैंने प्यार किया’ या सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन हिच्या मुंबईतील घरात चार वर्षापूर्वी दोन चोरांनी घुसून लाखो रूपयांच्या दागिन्यांची चोरी आणि तिच्या सासू आणि सासऱ्यांना मारण्याचा प्रयत्न केला होता. या चोरांना वागळे इस्टेट गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून ६२ हजार रुपयांचे चोरीचे दागिने हस्तगत करण्यात आले.

आरोपींनी २०१४ मध्ये भाग्यश्रीच्या घरात घुसून, तिच्या सासू-सासर्यांना गुंगीच औषध देउन लाखो किंमतीच्या दागिन्यांची चोरी केली होती. घरफोडी करणारे दोन्ही आरोपी पिंटू हृदयराम निशाद (२६) आणि त्रिवेणी ऊर्फ महेश भुनीलाल निशाद (३३) हे रोड नंबर २ येथील वसंत विहार सर्कलजवळ असल्याची माहीती ठाणे गुन्हा शाखा युनिट ५ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराज रणवरे यांनी मिळाली होती. त्यानुसार पीएसआय शिवराज बेंद्रे, श्रीनिवास तुंगेनवार यांच्या पथकाने सापळा रचून दोघांना अटक केली. दोघांची झडती घेतली असता स्क्रू ड्रायव्हर आणि लोखंडी कटावणी मिळाली. या चोरट्यांकडून ६२ हजार रुपयांचे दागिने हस्तगत करण्यात आले.

वर्तकनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत आरोपींनी घरफोडीची केली असल्याची कबुली दिली. चौकशी दरम्यान २०१४ मध्ये भाग्यश्रीच्या मुंबईतील घरात झालेल्या चोरीत त्यांचा सामावेश असल्याचे सिद्ध झाले. आरोपींनी आपल्या अन्य साथी दारांच्या साहाय्याने ही चोरी केली होती. जुहू पोलिस ठाण्यात २४ जानेवीरी २०१४ ला गुन्हा दाखल झालेला

loading...

Top 10 News

Popular News

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Wed Jun 20 03:43:09 +0000 2018

#JMBREAKING राहुल गांधी यांना महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाची नोटीस, जामनेरमधील अल्पवयीन मुलांच्या मारहाणी… https://t.co/TEuVVGD3KZ
Jai Maharashtra News
Wed Jun 20 01:30:00 +0000 2018

#सुविचार #शुभसकाळ #ThoughtOfTheDay #MotivationalQuote #suvichar #WednesdayMotivation #WednesdayWisdom https://t.co/QuCZ0vDyVX

Facebook Likebox