Tuesday, 11 December 2018

…म्हणून आमिर खानने राणी मुखर्जीची मागितली माफी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

राणी मुखर्जीने आपल्या करिअरची सुरुवात संघर्षातून केली आहे. राणीचा आवाजच तिची ओळख आहे. मात्र, करिअरच्या सुरुवातीला एका काळी काहींचे म्हणणे होते की, राणीचा आवाज आदर्श अभिनेत्रींसारखा नाही. गुलाम या चित्रपटाचा किस्सा सांगताना राणी मुखर्जीने म्हटले की, आमिर खाननिर्देशक विक्रम भट्ट आणि निर्माता मुकेश भट्ट यांना वाटले की, राणीचा आवाज या भूमिकेला शोभणार नाही. म्हणून तिच्या कॅरेक्टरचा आवाज डब करण्यात आला होता.

त्याचवेळी राणी ग़ुलाम आणि करण जोहरचा चित्रपट 'कुछ कुछ होता हैया दोन्ही चित्रपटात एकत्र काम करत होती. तेव्हा करण जोहरने राणीला सांगितले की, आधीच्या चित्रपटात तुझ्या आवाजात डबिंग करण्यात आली होती. मात्र, या चित्रपटात मी तुझा खरा आवाजच ठेवणार आहे.राणीने सांगितले की करण जोहरचा हा विश्वासच पुढे माझी हिम्मत बनला आणि माझा स्वत: वरचा कॉन्फिडंस देखील वाढला. 'कुछ कुछ होता हैहा चित्रपट पाहिल्यानंतर आमिर खान ने राणीला फोन केला आणि तीची माफी मागितली. आमिर खान ने राणीला सांगितले की मला विश्वासच नाही बसला की हा तुझा आवाज आहे तुझा आवाज खरंच चांगला आहे. 

loading...

Top 10 News

राशी भविष्य