Thursday, 22 February 2018

पहिल्याचं दिवशी ‘पद्मावत’चं बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कलेक्शन

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

‘पद्मावत’ चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच हा सिनेमा वादात सापडलेला. मात्र अनेक वादानंरतही ‘पद्मावत’ सिनेमा 25 जानेवारी रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. 25 जानेवारी रोजी 7 हजार स्क्रिन्सवर हा चित्रपट रिलीज झाला.

मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि गोवा या देशातील चार राज्यांत हा चित्रपट रिलीज झाला नाही. मात्र तरीदेखील रिलीजच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 18 कोटींचा व्यवसाय केला आहे.

देशभरातून तीव्र विरोध होत असतानाही प्रेक्षकांनी मात्र या चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला आहे. या चित्रपटाचे बजेट 180 कोटी इतके आहे. आयमॅक्स आणि थ्रीडीमध्ये हा चित्रपट कन्व्हर्ट करण्यासाठी 20 कोटींचा खर्च करण्यात आला.

लागोपाठ आलेली सुटी आणि हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता यामुळे पुढच्या तीन दिवसांत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकतो असं चित्रपट व्यापार विश्लेषकांचं मत आहे.

padmavat_image2.jpg

Top 10 News

Facebook Likebox

Popular News

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Wed Feb 21 16:49:26 +0000 2018

लेटेस्ट न्यूज व्हिडीओज् पाहाण्यासाठी...सबस्क्राईब करा यूट्युब चॅनेल...https://t.co/o6Fhysp4Vx https://t.co/gq3l5O8v6U
Jai Maharashtra News
Wed Feb 21 16:49:13 +0000 2018

लेटेस्ट न्यूज आणि अपडेटसाठी #Like करा जय महाराष्ट्रचं #Facebook #Page https://t.co/I2sUB7t4f0 https://t.co/C40WJRK5Cg