Sunday, 16 December 2018

...अन् शनायाचं ब्रेकअप झालं

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुबंई

 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेमध्ये  राधिका गुरुनाथ सुभेदारच्या संसारात काडी टाकण्याचं काम शनाया अर्थात रसिका सुनिलने अगदी उत्तम केलं आहे. या सीरिअलमधल्या तिच्या लूक आणि भूमिकेची प्रचंड चर्चा आहे. छोट्या पडद्यावरची ही हॉट मुलगी रिअल लाईफमध्ये मात्र सेट होती ती सिद्धार्थ चांदेकरसोबत. आणि म्हणूनच या मालिकेच्या प्रत्येक नव्या शूटला सिद्धार्थ सेटवर हजर असायचा.

पण इकडे मालिकेचे एपिसोड वाढले आणि तिकडे सिद्धार्थ चांदेकरची रुची बदलली. बघता बघता दोघेही एकमेकांपासून दुर झाले. आणि ही जोडी फुटली मग काय या दोघांचे फोटोही दिसेनासे झाले. हे दोघे कुठेही एकत्र दिसेनासे झाले आणि अचानक सिद्धार्थ चांदेकरांच्या आयुष्यात एक नवी मुलगी आली.

सध्या सिद्धार्थ चांदेकरांची जोडी जमलीय ती मिताली मयेकरसोबत. मिताली इन्स्टाग्रामवर सॉलिड अॅक्टिव्ह असते. 'उर्फी'मध्ये आपण तिला पाहिलं होतं. शिवाय झी युवाच्या 'फ्रेशर्स' मालिकेतही ती झळकली होती.

आता सिद्धार्थ चांदेकर आणि मितालीचं नातं चांगलंच फुलंल आहे. दोघांनी मनगटावर एकत्र टॅटूही काढले आहेत आणि तेही अगदी सेम टू सेम. शनयाची जोडी कुणासोबत जमली आहे की नाही, ते कळायला मात्र मार्ग नाहीये. पण सध्या तर तिचा फोकस फक्त गुरुनाथवर आहे.

shidharth-shanya.jpg

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य