Friday, 14 December 2018

प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर ‘पॅडमॅन’ आणि ‘पद्मावत’ एकमेकांसमोर

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

या वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर 'पद्मावत' आणि 'पॅडमॅन' हे दोन्ही सिनेमे एकमेकांमसमोर उभे राहणार आहेत. येत्या 25 जानेवारीला दोन्ही सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

‘पॅडमॅन’ प्रदर्शनाची  25 जानेवारी ही आधीपासूनच ठरलेली तारीक होती. तर ‘पद्मावत’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकल्यामुळे त्याची तारीख निश्चित नव्हती. मात्र आता प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त साधत हाही सिनेमा प्रदर्शित होतोय. असं वृत्त पीटीआय या वृत्त संस्थेनं दिलं आहे.

एकीकडे पद्मावत सिनेमाबाबत कधी ‘पद्मावती’ या सिनेमाच्या नावावरून वाद निर्माण झालेला. तर कधी सिनेमाच्या ‘घूमर’ या गाण्यावरून वाद निर्माण झालेला मात्र आता या सर्व अडणींना बाजूला सारत अखेर आता सिनेमा प्रदर्शीत होत आहे.

दुसरीकडे अक्षय कुमारच्या ‘पॅडमॅन’ बाबत चाहत्यांमध्ये कमालीची उत्सूकता आहे. या सिनेमातून अक्षय कुमार सॅनिटरी पॅडबाबत जागरुकता करताना दिसणार आहे. येत्या 25 जानेवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन आर बाल्की यांनी केलं आहे.

विशेष म्हणजे, ‘पॅडमॅन’ आणि ‘पद्मावत’ सोबत आणखी एक सिनेमेही प्रदर्शित होत आहे, तो म्हणजे नीरज पांडे यांचा 'अय्यारी'.  अक्षय कुमारचा 'पॅडमॅन', संजय लिलाभंसालींचा ‘पद्मावत’ आणि नीरज पांडे यांचा 'अय्यारी' हे तिनही सिनेमे एकाच दिवशी रिलीज होत आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य