Sunday, 18 March 2018

पद्मावती सिनेमाला करणी सेनेचा विरोध कायम

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

पद्मावती चित्रपटाच्या प्रदर्शनासंबंधी सेन्सॉर बोर्ड आणि चित्रपटाच्या निर्मात्यांमध्ये ठरलेला तडजोडीचा फॉर्म्युला करणी सेनेने फेटाळून लावला. चित्रपटावर बंदी घालण्याच्या आपल्या मागणीवर करणी सेना ठाम आहे. करणी सेनेने सरकार आणि सेन्सॉर बोर्डाला इशारा दिला आहे. पद्मावती चित्रपट प्रदर्शित झाल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी करणी सेनेने दिली आहे.

सेन्सॉर बोर्डाच्या सूचनेनुसार चित्रपटात काही बदल करण्यात येणार आहेत. पण, करणी सेनेला हे बदल मान्य नाहीत. या चित्रपटावर बंदी घालण्याच्या मागणीवर ते ठाम आहेत. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर जे काही होईल त्याला भाजपा सरकार आणि सेन्सॉर बोर्ड जबाबदार असेल अशी उघड धमकी करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांनी दिलीय.

padmavati-dipika.jpgचित्रपट सुरु होण्याआधी एक डिस्केलमर दिसेल. त्यावर चित्रपट काल्पनिक असल्याचा संदेश असेल. संजय लीला भन्साळींचा चित्रपट जसा काल्पनिक आहे तसेच, आम्ही चित्रपटगृहात जेव्हा फुले उधळू ते सुद्धा काल्पनिकच असेल असे सुखदेव सिंह गोगामेडी म्हणाले आहेत.

Top 10 News

Facebook Likebox

Popular News

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Sun Mar 18 14:58:25 +0000 2018

राज ठाकरे - अक्षय कुमार विषयी बोलताना, अक्षय कुमार भारतीय नागरीक नाहूी. https://t.co/2fWgZbAtWu https://t.co/sAbZ6bjVaa
Jai Maharashtra News
Sun Mar 18 14:55:37 +0000 2018

राज ठाकरे - देशात, राज्यात काय चाललंय कळेना . https://t.co/2fWgZbAtWu https://t.co/xwO970mpp6