Sunday, 18 March 2018

बीग बींकडून वर्सोवा बीचला गिफ्ट

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

अस्वच्छतेमुळे नेहमी चर्चेत असणाऱ्या वर्सोवा बीचच्या अस्वच्छतेला सर्वसामान्यांपासून सेलिब्रेटींपर्यंत सर्वजण हैराण असतात. बीचच्या सफाईसाठी नेहमी पुढे असनारे अफरोज शाह यांना यावेळी खुद्द बीग बी यांनी मदतीचा हात दिला. बिग बींनी जेसीबी आणि ट्रॅक्टर भेट म्हणून दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानात नेहमी पुढाकार घेणारे अमिताभ बच्चन यांनी वर्सोवा बीचच्या स्वच्छतेसाठी ही छोटी भेट दिली. आपल्या ट्विटर अकांऊंटवर फोटो शेअर करुन बिग बींनी ही माहिती दिली.

amitabh1.jpg

'एखाद्या चांगल्या कामासाठी हातभार लावण्याचा आनंद काही वेगळाच असतो. मी आज केलेलं कामाचा अनुभव हा आयुष्यातील सर्वात समाधानकारक अनुभव होता. वर्सोवा बीचच्या स्वच्छतेसाठी एक्सकॅवेटर आणि ट्रॅक्टर भेट दिला.' असं ट्वीट अमिताभ बच्चन यांनी केलं आहे

amitabh-bachchan-twitte.png

अफरोज शाह यांनीही बिग बींनी दिलेल्या जेसीबीआणि ट्रॅक्टरचे फोटो ट्विटर शेअर केले. पर्यावरणविरोधी लढ्यात तुम्ही आशेचा किरण आहात, अशा शब्दात शाहांनी बच्चन यांचे आभार मानले.

 

afroz-shah.png

 

Top 10 News

Facebook Likebox

Popular News

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Sun Mar 18 14:58:25 +0000 2018

राज ठाकरे - अक्षय कुमार विषयी बोलताना, अक्षय कुमार भारतीय नागरीक नाहूी. https://t.co/2fWgZbAtWu https://t.co/sAbZ6bjVaa
Jai Maharashtra News
Sun Mar 18 14:55:37 +0000 2018

राज ठाकरे - देशात, राज्यात काय चाललंय कळेना . https://t.co/2fWgZbAtWu https://t.co/xwO970mpp6