Tuesday, 18 December 2018

रेणुका शहाणे ‘द लेडी डॉन’ च्या भूमिकेत

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

'हम आपके है कौन' या चित्रपटांमुळे प्रेक्षकांच्या मनात सोज्ज्वळ, सालस आणि सगळ्यांची मन जिंकणारी अशी प्रतिमा निर्माण करणारी मराठमोळी अभिनेत्री रेणुका शहाणे लवकरच पुन्हाएकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रेणुकाने अनेक चित्रपट तसेच मालिकांतही काम केले आहे.पण या वेळी तिच्या नवीन चित्रपटात रेणुकाची भूमीका काहीशी वेगळीच असणार आहे.

‘खिचडी’हा तिचा आगामी चित्रपट असणार आहे. चित्रपटात रेणुका शहाणे 'लेडी डॉन'च्या भूमिकेत दिसणार आहे. यातच भर म्हणून खूद्द तिचे पति आशितोष राणाने त्यांच्या या चित्रपटाचे दीग्दर्शन रेणुकाने कराव अशी इच्छा व्यक्त केली आहे.

छोट्या पडद्यावर याआधीही हिट ठरलेली 'खिचडी' पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झाली आहे. यात रेणुका शहाणे 'लेडी डॉन'ची पण विनोदी व्यक्तिरेखा साकारत आहे. इतकेच नव्हे, तब्बल 23 वर्षांनंतर ती माधुरी दीक्षित सोबत चित्रपटात दिसणार आहे. त्यामुळे रेणुका आणि माधुरी दीक्षितची जुगलबंदी पुन्हा एकदा चाहत्यांना पहायला मिळणार आहे.

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य