Thursday, 18 January 2018

कधी हमाल तर कधी सुतार; बस कंडक्टर शिवाजी गायकवाडचा असा झाला सुपरस्टार रजनीकांत

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई

रजनीकांत कधी सुट्टी पाहून सिनेमा रिलीज करत नाही तर, तो फिल्म करतो आणि सुट्टी जाहीर होते; बस कंडक्टर शिवाजी गायकवाडचा सुपरस्टार रजनीकांत पर्यंतचा प्रवास अत्यंत रोमांचक आहे.

सुपरस्टार रजनीकांत यांचा वाढदिवस असून त्यांनी 67 व्या वयात पदार्पण केलंय.

रजनीकांत यांच खर नाव शिवाजीराव गायकवाड असून त्यांचा जन्म बँगलोरमध्ये झाला होता.

एका बस कंडक्टरपासून ते फिल्म सुपरस्टार पर्यंतचा त्यांचा प्रवास आहे.

 

असा घडला सुपरस्टार रजनीकांत

- रजनीकांतने कधी हमाल म्हणून कधी सुतार म्हणून काम केले

- नंतर ते बंगलोरच्या ट्रान्सपोर्ट सर्व्हिसमध्ये ते कंडक्टर म्हणून रुजू झाले.

- नोकरी सांभाळून रजनीकांतने मद्रास फिल्म इन्स्टिट्यूटमधून अभिनयाचे प्रशिक्षण घेतले.

- सुरुवातीच्या काळात, सहाय्यक खलनायक, बलात्कारी, चोर अशाच भूमिका रजनीकांत यांच्या वाट्याला आल्या.

- 1977 साली तेलगू फिल्म चिलगम्मा चेप्पिन्डी या फिल्ममधल्ये रजनीकांतला पहिला लीड रोल मिळाला.

- 1978 पासून रजनीकांत यांच्या फिल्मचा सपाटा सुरु झाला.

 

- तमिळ, तेलगू आणि कन्नड अशा तब्बल 20 चित्रपटांमध्ये रजनीकांत यांना भूमिका मिळाल्या.

- 1978 साली आलेल्या भैरवी या फिल्मने रजनीकांत यांना सुपरस्टार बनवले.

- एम भास्कर यांनी रजनीकांतचे 35 फुटी पोस्टर चेन्नईमध्ये झळकवले.

- 80 च्या दशकापर्यंत रजनीकांतने सुमारे 50 फिल्म्स केल्या.

- 1980 साली आलेल्या डॉनचा रिमेक बिल्लानं रजनीकांतला साऊथचा अमिताभ अशी ओळख दिली.

-  मणिरत्नमसोबतचा दलपती सिनेमा हा रजनीच्या आजवरच्या सर्वोत्तम सिनेमा

- रजनीकांत सुपरस्टार होण्यामागे त्याच्या भन्नाट स्टाईल्सचा वाटा मोठा आहे.

- सिगरेट पेटवण्याची स्टाईल, गळ्यातला मफलर हवेत उडवून पुन्हा गळ्यात अडकवण्याची स्टाईल, पाय फिरवून वावटळ उठवणारा कदाचित दुसरा कुणीच नसावा.

- गॉगल घालण्याची टेक्निक तर सर्वात लोकप्रिय

- 1984 मध्ये अंधा कानून या फिल्ममधून रजनीकांत यांनी बॉलिवुडमध्ये एन्ट्री घेतली आणि त्यांच्या करिअरमध्ये नवा ट्वीस्ट आला.

- त्यानंतर 1985 सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यासोबत बेवफाई या फिल्ममध्ये रजनीकांतने निगेटिव्ह रोलही साकारला.

- रजनीने हॉलिवुडमध्येही सीमोल्लंघन केलं. 1988 साली ब्लडस्टोन नावाच्या फिल्ममध्ये रजनीकांत यांनी काम केलं.

- 1991 साली पुन्हा एकदा अमिताभ सोबत हम या फिल्ममध्ये रजनीने महत्त्वाची भूमिका साकारली.

- फरिश्ते, आतंक ही आतंक, मेरी अदालत, जॉ जॉनी जनार्दन, वफादार, गिरफ्तार, दोस्ती-दुश्मनी, खून का कर्ज, फूल बने अंगारे अशा फिल्म्समधून रजनीकांत यांना दुय्यम भूमिका मिळू लागल्या. त्यामुळे रजनीकांत यांनी पुन्हा एकदा दक्षिणेवरच लक्ष केंद्रित केलं.

Top 10 News

Facebook Likebox

Popular News

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Wed Jan 17 17:27:25 +0000 2018

काटकसरीचा तडाखा लावणाऱ्या तुकाराम मुंढेंचं घर भाडं 95 हजार रुपये - https://t.co/omVXMmBkfv @PuneriSpeaks https://t.co/0b3pFkmIWe
Jai Maharashtra News
Wed Jan 17 16:53:52 +0000 2018

BMC चा अबज कारभार; चतुर्थ क्षेणीच्या पदासाठी MPSC परीक्षेसारखा कठीण पेपर -https://t.co/s5eOYgCrYi @Mazi_Marathi… https://t.co/yuNbNmjTHw