Tuesday, 21 August 2018

दिग्दर्शक मधुर भंडारकर यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मधुर भंडारकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. आणीबाणीच्या कालखंडावर आधारीत त्यांच्या इंदू सरकार चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास उच्च

न्यायालयाने नकार दिला आहे.

 

माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांची मुलगी असल्याचा दावा करणाऱ्या प्रिया पॉल यांनी मधुर भांडारकर यांच्या इंदू सरकार विरुद्ध उच्च

न्यायालयात धाव घेतली होती.

 

या चित्रपटात काय सत्य आहे आणि काल्पनिक काय आहे हे मधुर भांडारकर यांनी स्पष्ट करावे असे प्रिया पॉल यांनी याचिकेत म्हटले आहे.

 

काही दिवसांपूर्वीच मधुर भांडारकरांनी चित्रपटात दाखविण्यात आलेला आणीबाणीचा काळ सत्य असून, उर्वरित कथा काल्पनिक असल्याचे स्पष्ट केले आहे.

 

चित्रपटाचा 30 टक्के भाग सत्यावर आधारित असून, 70 टक्के भाग काल्पनिक असल्याचेही त्यांनी सांगितले होते.

 

त्यामुळे हे नेमकेपणाने स्पष्ट करावे, असे प्रिया पॉल यांचे म्हणणे होते. हा चित्रपट 28 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.

loading...

Top 10 News

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Mon Aug 20 16:29:40 +0000 2018

केरळमधला प्रलय नैसर्गिक आपत्ती की मानवनिर्मित? लाखो लीटर पाणी शहरांमध्ये शिरण्याला जबाबदार कोण? पुराची आधीच भविष्य… https://t.co/ieBEjH2Lib
Jai Maharashtra News
Mon Aug 20 16:07:46 +0000 2018

निकसह सासू सासऱ्यांसोबत प्रियंकाने दिली अनाथाश्रमाला भेट - https://t.co/VB0siuSHKK #PriyankaNickEngagement… https://t.co/i1cgEJ1yp1

Facebook Likebox