Sunday, 20 January 2019

यंदा ‘या’ सोप्या पद्धतीने सक्रांतीला व्हॉट्सअॅप स्टीकर्स पाठवून द्या शुभेच्छा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

लोकप्रिय अॅप व्हॉट्सअॅपने काही दिवसांपूर्वीच आपले स्टीकर्सचे नवीन फीचर लाँच केले होते. अँड्रॉईड आणि आयफोन अशा दोन्हीसाठी सुरु झालेल्या या फीचरचा युजर्सनी मोठ्या प्रमाणात वापर केला होता. वेगवेगळ्या निमित्ताने आपल्या मित्रमंडळींना आणि कुटुंबातील व्यक्तींना शुभेच्छा देण्यासाठी या फीचरचा वापर करण्यात येतो. आता मकर संक्रांतीच्या निमित्ताने तुम्ही एकमेकांना शुभेच्छा देण्याचा विचार करतच असाल तर यंदा या स्टीकर्सचा वापर करुन तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना आणि कुटुंबातील सदस्यांना शुभेच्छा देऊ शकता. आता हे स्टीकर कसे पाठवायचे असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर या सोप्या पद्धतीने तुम्ही शुभेच्छा पाठवण्यासाठी स्टीकरचा वापर करु शकता.

अँड्रॉईड युजर्ससाठी ही सोपी पद्धत

  • व्हॉट्सअॅप ओपन करुन स्मायली आयकॉनवर क्लिक करा
  • स्मायलीच्या पर्यायामध्ये GIF च्या बाजूला स्टीकरचा पर्याय येईल
  • यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या स्टीकरचे पॅक दिसतील
  • त्यामध्ये ‘Get more stickers’ असा पर्याय असेल, मकर संक्रांतीचे स्टीकर्स मिळवण्यासाठी त्यावर क्लिक करा
  • यानंतर तुम्ही गुगल प्ले स्टोअरवर जा
  • यामध्ये तुम्हाला स्टीकर्ससाठी अनेक अॅप्लिकेशन्स मिळतील, त्यातून तुम्हाला हवी ती स्टीकर्स तुम्ही डाऊनलोड करुन घेऊ शकता
  • डाऊनलोडींग पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ते अॅप्लिकेशन ओपन करुन ‘Add to Whatsapp’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला मकर संक्रांतीचे स्टीकर्स मिळतील
  • त्यानंतर तुम्ही हे स्टीकर्स एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी पाठवू शकता

आयफोन युजर्ससाठी

आयफोन युजर्सना कोणत्याही अॅप्लिकेशनच्या माध्यमातून स्टीकर्स डाऊनलोड करण्याचा पर्याय नसेल. पण याठिकाणी असलेल्या पर्यायामुळे तुम्हाला तुमच्या मित्रमंडळींना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देता येणार आहेत.

तुम्हाला आलेले स्टीकर तुम्ही फेवरेट म्हणून मार्क केल्यानतंर ते तुमच्याकडे सेव्ह राहतील. यासाठी तुम्हाला त्यावर लाँग प्रेस करुन स्टार मार्क करुन ठेवावे लागणार आहे.

त्यानंतर एकदा या स्टार मार्कवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुम्ही मार्क केलेले सगळे फेवरेट स्टीकर्स एका ठिकाणी दिसतील.

loading...