Sunday, 20 January 2019

नवीन वर्षात ‘या’ मोबाईलवरील व्हॉट्सअॅप होणार बंद

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने एक नवं फीचर आणण्याचं ठरवलं आहे. यासोबतच व्हॉट्सअॅपच्या काही जुन्या युजर्ससाठी एक बॅड न्यूज सुद्धा आहे. 31 डिसेंबर नंतर व्हॉट्सअॅप काही जुन्या ऑपरेटिंग सिस्टमला सपोर्ट करणे बंद करणार आहे, त्यामुळे त्यांच्या मोबाइलमधील व्हॉट्सअॅप चालणार नाही.

नोकियाचा जुना ऑपरेटिंग सिस्टम आता व्हॉट्सअॅपचा वापर करू शकणार नाही. Nokia S40, या ऑपरेटिंग सिस्टमवर चालणाऱ्या फोनमध्ये 31 डिसेंबरनंतर व्हॉट्सअॅप चालणार नाही. तसेच Android 2.3.7 आणि जुन्या व्हर्जनसोबत iPhone iOS7 वर 1 फेब्रुवारी 2010 नंतर व्हॉट्सअॅप चालणार नाही. याबाबतची व्हॉट्सअॅपने माहिती दिली आहे. तसेच काही फीचर्स कोणत्याही क्षणी बंद होतील, असेही कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

याआधीही व्हॉट्सअॅपने घेतलेल्या निर्णयानंतर Windows Phone 8.0, ब्लॅकबेरी OS आणि ब्लॅकबेरी 10 या मोबाइलमधील WhatsApp 31 डिसेंबर 2017 नंतर बंद झाले होते. 

loading...