Sunday, 20 January 2019

जम्मू- काश्मीरमध्ये 6 दहशतवाद्यांचा खात्मा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जम्मू- काश्मीरमधील त्राल येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली असून या चकमकीत 6 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तसेच दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

जम्मू- काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा येथील त्राल परिसरातील आरमपोरा गावात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. सुरक्षा दलांनी शनिवारी सकाळी परिसरात शोधमोहीम राबवली. यादरम्यान दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. या चकमकीत 6 दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. परिसरात शोधमोहीम राबवल्यानंतर सुरक्षा दलांनी ऑपरेशन संपल्याचे स्पष्ट केले. मृत दहशतवादी झाकीर मुसाच्या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याची माहिती मिळत आहे.  

भारतीय सुरक्षा दलांनी या वर्षभरात 230 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. गेल्या आठवड्यात पुलवामा येथील सिरनू या गावातही सुरक्षा दलांनी 3 दहशतवाद्यांना ठार केले होते. मात्र या चकमकीनंतर स्थानिक तरुण रस्त्यावर उतरले होते आणि या हिंसाचारात 6 तरुणांचा मृत्यू झाला होता.

loading...