Sunday, 20 January 2019

पुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथील चकमकीनंतर स्थानिक तरुणांनी सुरक्षा दलांवर दगडफेक केली. यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात या हिंसाचारात एकूण 6 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त गुलाम मोहम्मद यांनी दिली आहे.

पुलवामा येथील सिरनू या गावात दहशतवादी लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार शनिवारी पहाटे चारच्या सुमारास पोलीस आणि सैन्याच्या संयुक्त पथकाने या भागात शोधमोहीम राबवायला सुरुवात केली.

या चकमकीत 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. तर एक जवान शहीद झाला आहे. या चकमकीनंतर स्थानिक तरुण रस्त्यावर उतरले.

loading...