Sunday, 20 January 2019

जम्मू-काश्मीरमध्ये 14 वर्षाच्या दहशतवाद्याचा खात्मा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरच्या मजगुंड परिसरात मुदासीर 14 वर्षाच्या खात्मा करण्यात करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात हातात AK-47 घेतलेला त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. इयत्ता 9वी पर्यंत शिकलेला मुदासीर लश्कर-ए-तोयबाशी संबंधित होता व 31 ऑगस्टपासून त्याचा मित्र बिलालसोबत घरातून गायब होता.

पोलिसांच्या माहितीनुसार मुदासिर आणि बिलाल दोघेही 5 महिन्यांपासून गायब होते. त्या दोघांना घरी परत बोलावण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी प्रचंड प्रयत्न केले होते. मुदासीर हा हाजिन बांदीपोरा येथील रहिवासी आहे. ज्या दिवशी हे दोघे घरातून पळाले त्याच दिवशी हाजिन येथे एक चकमक उडाली होती आणि यामध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा झाला होता. त्याचा व्हायरल झालेला फोटो 3 महिन्यांपूर्वीचा असू शकतो असेही पोलिसांनी म्हटले आहे.

दरम्यान, शनिवारी संध्याकाळी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी आणि लष्कराच्या जवानांमध्ये चकमक उडाली. सुरक्षारक्षकांनी श्रीनगर-बांदीपुरा मार्गावर नाकाबंदी करुन शोधमोहिम हाती घेतली होती. त्याचवेळी दहशतवाद्यांनी गोळीबार केला, प्रत्युत्तरात सुरक्षा रक्षकांकडूनही जोरदार गोळीबार सुरू झाला. यामध्ये मुदासीरसह आणखी एक अतिरेकी ठार झाला. तसेच या चकमकीत लष्कराचे 5 जवान देखील जखमी झाले.

loading...