Sunday, 20 January 2019

आता एकाच फोनमध्ये करा एकापेक्षा जास्त ‘व्हॉट्सअॅप’चा वापर

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

आपण दिवसभरात जसं मोबाईलशिवाय राहू शकत नाही, तसंच या व्हॉट्सअॅपशिवाय राहणंही जवळजवळ अशक्य झालं आहे. व्हॉट्सअॅप हा आपल्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण भाग बनला आहे. मात्र इतर अॅपप्रमाणे या अॅपलाही काही मर्यादा आहेत. सध्या आपण एका फोनमध्ये एकच व्हॉट्सअॅपचा वापर करु शकतो. पण तुम्हाला हे माहित आहे का? की तुम्ही एकाच फोनमध्ये एकापेक्षा जास्त व्हॉट्सअॅप वापरु शकता. चला तर जाणून घेऊया एका फोनमध्ये एकापेक्षा जास्त व्हॉट्सअॅपचा वापर कसा करता येईल?

  • जर तुमच्याकडे ‘ओप्पो फोन’ आहे तर सर्वातआधी तुम्ही सेटिंगमध्ये जा. त्यानंतर clone app ला सिलेक्ट करा.
  • ऑनरच्या फोनमध्ये हा ऑप्शन ‘App Twin’ नावाने तर शिओमीमध्ये ‘Dual Apps’ नावाने दिसेल. हा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर त्या सगळ्या अॅपची लिस्ट समोर येते जे तुम्ही 2 वेगवेगळ्या अकाऊंटनी ओपन करू शकता. यात तुम्ही व्हॉट्सअॅप सिलेक्ट करा.
  • याशिवाय इतर अण्ड्रॉइड डिवाइजबद्दल बोलायचे झाले तर सेटिंगमध्ये Apps चा ऑप्शन असेल. यात ‘Parallel Apps’ हा पर्याय दिसेल. हा पर्याय निवडल्यावर सर्व अॅपची लिस्ट येईल. यात तुम्ही व्हॉट्सअॅपला सिलेक्ट करू शकता. आता होम स्क्रिनवर गेलात तर अजून एक व्हॉट्सअॅप दिसेल. अशाप्रकारे तुम्ही एकाचवेळी दोन व्हॉट्सअॅपचा वापर करु शकता.
  • मात्र आयफोन युझर दोन व्हॉट्सअॅपचा वापर करू शकत नाहीत. पण कॉम्प्युटरवर एकाहून जास्त व्हॉट्सअॅप वापरायचे असतील तर तुम्ही सहज वापरू शकता.
  • यासाठी सुरूवातीला whatsapp web सुरू करा. त्यानंतर QR कोड स्कॅन करून पहिलं अकाऊंट सुरू करा. यानंतर dyn.web.whatsapp.com ओपन करा. दुसऱ्या अकाऊंटचा QR कोड स्कॅन करा.

तर अशाप्रकारे तुम्ही एकाच फोनवर किंवा कॉम्प्युटरवर एकापेक्षा जास्त व्हॉट्सअॅपचा वापर करु शकता.

loading...