Sunday, 20 January 2019

कल्याणमध्ये खाकीला काळीमा, रक्षकच बनला भक्षक...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

गर्दीच्या ठिकाणी छेड काढणारे नेहमीच पाहायला मिळतात. मात्र कल्याणमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकाराने रक्षकच भक्षक झाल्याचे समोर आले आहे. कल्याणच्या रेल्वे स्थानकात चित्रित केलेला एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने हा घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. 

कल्याण रेल्वे स्थानकातील 4 नंबर प्लॅटफॉर्मवर एका आरपीएफ जवानाने झोपेचं सोंग करत महिलेची छेड काढली होती. हे चकित करणार दृश्य एका व्यक्तीने आपल्या मोबाईल मध्ये कैद केले आणि या महिलेची छेड काढणाऱ्या या आरपीएफ जवानाला स्थानकातील प्रवाश्यांच्या मदतीने चोप दिला. 

या व्हिडीओमध्ये महिलेच्या मांडीवर एक बाळ आहे आणि आरपीएफ जवान तिच्या पाठीवरून हात फिरवताना दिसून येत आहे. हा व्हायरल झालेला व्हिडीओ प्रसारमाध्यमांच्या हाती लागल्यानंतर या आरपीएफ जवानावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 

सध्या रेल्वे पोलीस या महिलेचा शोध घेत असून मोबाईल मध्ये व्हिडीओ टिपणाऱ्या युवकाचा शोध स्थानकावरील सीसीटीव्हीच्या माध्यमातून घेतला जात आहे. 

loading...