Sunday, 20 January 2019

पाकिस्तानकडून शस्त्रसंधी उल्लंघन सुरूच, गोळीबारात बीएसएफचे २ जवान शहीद

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, जम्मू काश्मीर

आंतरराष्ट्रीय सीमा (आयबी) वर आज सकाळी पाकिस्तानने गोळीबार केला. पाकिस्तानने अशा वेळी गोळीबार केला जेव्हा त्यांनी भूतकाळात सीजफायरची अंमलबजावणी करण्याचे कबूल केले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री जवळपास २ वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानी सैन्यानं अखनूर सेक्टरमधील लष्कराच्या चौक्यांना लक्ष्य केलं.

रमजानच्या पवित्र महिन्यात भारतीय लष्करानं दहशतवादविरोधी कारवायांना पूर्णविराम दिला होता. तरी, पाकिस्तानकडून शस्त्रसंधी उल्लंघन सुरूच आहे. पाकिस्तानी सैन्यानं शनिवारी रात्री उशिरा अखनूर सेक्टरमध्ये केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) दोन जवान शहीद झाले. 

गोळीबारात बीएसएफचे दोन जवान गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केलं. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याशिवाय तीन नागरिकही जखमी झाले आहेत. अंदाधुंद गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याला बीएसएफचे जवान सडेतोड प्रत्युत्तर देत आहेत. 

पाकच्या कुरापती सुरुच, भारताचं चोख प्रत्त्युत्तर

 

loading...