Sunday, 20 January 2019

व्हाटसअॅप तुमच्यासाठी घेऊन येतयं एक खास अपडेटेड फिचर...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

व्हाटसअॅपच्या माध्यमातून आपण फोटोज, स्टेटस, व्हिडीओज सहजरीत्या कोणालाही शेअर करु शकतो, मात्र आता व्हाटसअॅपच्या माध्यमातून आपल्याला पैशांचा व्यवहारही करता येणार आहे. व्हाटसअॅप लवकरचं भारतात एक नव फिचर लाँच करणार आहे.

यूजर्सना या आठवड्यात या फिचरचं अपडेट मिळणार आहे. याबाबत व्हाटसअॅप कंपनी एचडीएफसी, आईसीआईसी आणि एक्सिस बँकसोबत पार्टनरशिप करणार आहे. या फिचरच्या माध्यमातून आपण कुठेही असलो तरी आपल्याला हव्या त्या व्यक्तीला आपण पैसे पाठवू शकणार आहोत. या फिचरचा वापर करण्यासाठी यूजर्सना आपलं पेटीएम अॅप आपल्या बँक खात्याशी जोडावं लागणारं आहे.

loading...