Sunday, 20 January 2019

जम्मू काश्मीरला मागे टाकेल अशी मराठवाडा-विदर्भातील सकाळ

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मराठवाडा, विदर्भाला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसला आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या हरभरा, कांदा, गहू पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मराठवाड्यातील काही भागात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आहे. जालना, बीड, वाशिम, अकोला, बुलडाण्यात गारपीटीसह पाऊस झाला.

अकोला गारपीट

akola-garpit.png

जालन्यात गारांचा अक्षरश: खच पडल्याचं चित्र बघायला मिळालं. जालना शहरासह अंबड, मंठा तालुक्यातही गारांसह पाऊस झाला. जालन्यात तर सध्या रस्त्यावर गारांचा पांढराशुभ्र खच पडल्याचं चित्र दिसत आहे.

jalna-garpit.png

बीड जिल्ह्यातील पिंपळनेर परिसरातही गारांचा पाऊस झाला. लिंबाच्या आकाराइतक्या गारा पडल्याचं स्थानिक सांगतात. 

beed-garpit1.png

beed-garpit2.png

धुळे शहर परिसरात मेघगर्जनेसह पावसाच्या हलक्या सरी बरसल्या.

buldhana-garpit.png

buldhana-garpit1.png

बुलडाण्यातील चिखली तालुक्यात गारांचा पाऊस झाला असून वादळी वारा सुरु आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर, तेल्हारा, अकोट तालुक्यात गारपिटीसह जोरदार पाऊस झाला.

vashim-garpit1.png

vashim-garpit.png

वाशिम गारपीट

loading...