Sunday, 20 January 2019

कल्याणमध्ये बहीण भावासोबत रिक्षाचालकाचे गैर वर्तन

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, कल्याण

कल्याणमध्ये एका मद्यधुंद रिक्षाचालकाने तरुण आणि त्याच्या बहिणीसोबत उद्धट वर्तन केल्याची घटना घडली आहे. 

ठाण्याच्या एका नामांकित कंपनीत काम करणारा गौरव भारद्वाज हा त्याच्या बहिणी सोबत गुरुवारी सायंकाळी कल्याण स्थानकाच्या पश्चिम भागातून पूर्वेतील लोकग्राम भागातील घरी जाण्यासाठी निघाला असता एसटी डेपो समोरुन त्याने शेअर रिक्षा पकडली.

रिक्षाचालक नशेत असल्याने तो अतिशय वेगात रिक्षा चालवत होता. त्यामुळे गौरव आणि रिक्षातील इतर प्रवाशांनी त्याला रिक्षा हळू चालवण्यास अनेकदा सांगीतले. मात्र रिक्षाचालकाने काहीही ऐकत नव्हता. पोलिसात तक्रार करण्याच्या धमकीलाही त्याने दाद दिली नाही.

अखेर रिक्षाचालकाला कंटाळून गौरव बहिणीसोबत मेट्रो जंक्शन मॉलजवळ उतरला आणि सुट्टे पैसे नसल्याने गौरव ते आणण्यासाठी गेला. मात्र तितक्या वेळात या रिक्षाचालकाने गौरवच्या बहिणीसोबत गैरवर्तन केलं.

हा सगळा प्रकार गौरवच्या बहिणीने मोबाईलमध्ये कैद केला आणि सोशल साईट्सवर टाकला.

याप्रकरणी गौरवने शुक्रवारी रात्री उशिरा कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून याप्रकरणी पोलीस सध्या तपास करत आहेत.

loading...