ऐश्वर्या रायचा घटस्फोट!

aish_tej.jpg

राष्ट्रीय जनता दलचे नेते लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेजप्रताप यादव आपली पत्नी ऐश्वर्या राय हिला घटस्फोट देतोय. लग्नानंतर अवघ्या 5 महिन्यांतच दोघांमध्ये काडीमोड झालाय. 12 मे रोजी दोघेही मोठ्या थाटामाटात विवाहबद्ध झाले होते. मात्र त्यांचा विवाह जेमतेम 6 महिनेही टिकू शकला नाही. ऐश्वर्या राय ही देखील बिहारमधील राजकीय घराण्यातील आहे. तिचे आजोबा आणि वडील हे लालू प्रसाद यादव यांच्या अत्यंत जवळचे असल्यामुळे खुद्द लालू प्रसाद यांनी हा विवाह जमवून आणला होता. मात्र तेजप्रताप आणि ऐश्वर्यामधील नातं काही दिवसांतच संपुष्टात आलंय.

aish_tej.jpg

 

तेजप्रताप आणि ऐश्वर्याचा विवाह पाटण्याला अगदी शाही थाटात झाला होता. या विवाहासाठी लालू प्रसाद यादव पॅरोलवर बाहेर आले होते आणि लग्नात सहभागी झाले होते.

wedding_630_630.jpg

 

तेजप्रताप नाराज!

यादव यांच्या कुटुंबात आधीपासूनच वाद सुरू आहेत. नीतिश कुमार बिहारचे मुख्यमंत्री झाले, तेव्हा लालू प्रसाद यांचा धाकटा मुलगा तेजस्वी हा उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाला. तेजप्रतापला मात्र तेवढं मोठं मंत्रीपद मिळू शकलं नाही. त्यामुळे तेजप्रताप नाराज होता. तेजप्रतापचं आपले वडील लालू प्रसाद आणि भाऊ तेजस्वी या दोघांशीही पटत नाही. विवाह झाल्यानंतर पत्नी ऐश्वर्याशीही त्याचा वाद सुरू झाला. अवघ्या काही दिवसांतच दोघं वेगवेगळे राहू लागले आणि अखेर त्यांच्यातील वाद अवघ्या 5 महिन्यांत कोर्टात जाऊन पोहोचला.  

Tej-Pratap-with-his-wife-Aishwarya-Rai.jpg

कोण आहे ऐश्वर्या राय?

ऐश्वर्या राय बिहारचे माजी मुख्यमंत्री दरोगा राय यांची नात आहे.

ऐश्वर्याचे वडिल चंद्रिका राय हे देखील राजदचे नेते असून लालू प्रसाद यांचे निकटवर्तीय आहे.

लालू प्रसाद यांच्या राजकीय कारकीर्दीत दरोगा राय यांचा मोठा वाटा आहे.

त्यामुळे लालू प्रसाद यांनी आपल्या मुलासाठी ऐश्वर्या रायचं स्थळ निश्चित केलं. हे लग्न लव्ह मॅरेज नसून अरेंज मॅरेजच होतं. 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *