ट्विटरचं ‘हृदय’ होणार बंद!

सोशल मीडियाच्या जमान्यात ट्विटर युजर्सची संख्या मोठीआहे. कमी शब्दांत ट्विटरवर केली जाणारी ट्विट्स आपण एकतर ‘रीट्विट’ करतो किंवा ‘लाईक’ करतो. पण आता लाईक करणं आपल्याला शक्य होणार नाहीय. कारण ट्विटरवरून हृदयाचा (हार्ट)चा आकार असणारं लाईक बटण लवकरच बंद करण्यात येणार आहे.

ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सी यांनी याबद्दल वक्तव्य केलं आहे. हे ‘लाईक’चं बटण आपल्याला कधीच आवड़लं नसल्याचं त्यांनी म्हटलंय. याच कारणामुळे हे बटणच काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचं ट्विटद्वारे त्यांनी स्पष्ट केलंय.

‘टेलिग्राफ’ने दिलेल्या माहितीनुसार ट्विटर ‘लाईक’चं बटण काढून टाकण्यासंबंधी विचार करत आहे. ट्विटर कम्युनिकेशनने मात्र आपण आपल्या सेवांबद्दल पुनर्विचार करत असल्याचं म्हटलंय.आम्ही बदल करण्याच्या प्राथमिक स्तरावर आहोत, निरोगी संभाषणाला प्रोत्साहन देण्याचा आमचा हेतू आहेत. ज्यामध्ये लाईक बटणही येते. त्यामुळे आत्ताच काही आम्ही सांगू शकत नाही असं लिहिलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *