‘हिटमॅन’ रोहित शर्माने मोडला ‘बूम बूम’ आफ्रिदीचा विक्रम

टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्मा याने एक नवीन विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे. रोहितने आज वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे सामन्यात ५६ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकारांनिशी ६३ धावा केल्या. पण याचवेळी रोहितच्या नावावर एक विक्रम जमा झालाय. रोहितने आपल्या वन-डे कारकीर्दीत २०२ षटकार जमा केले आहेत. या षटकारांसह त्याने पाकिस्तानच्या शाहीद आफ्रिदीचा रेकॉर्ड मोडलाय.

याआधी मालिकेतील चौथ्या वनडेत रोहितने १६२ धावांची तडाखेबंद खेळी करताना त्यात २० चौकार आणि ४ दमदार षटकार लगावले होते. त्या सामन्यात रोहितने सचिन तेंडुलकरच्या षटकारांचा विक्रम देखील मोडला होता. आता नंबर लागतो तो गेलचा. त्याच्या नावावर २७५ षटकार आहेत. तसंच श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याच्या नावावर २७० षटकार आहेत. भारतामधून सर्वाधिक षटकार महेंद्रसिंग धोणीने केले आहेत. धोणीने ३३१ वनडे सामन्यांत २८१ डावांमध्ये २१८ षटकार ठोकले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *