#MeToo राखी सावंतची तनुश्रीकडे ‘एवढ्या’ रक्कमेची मागणी!

#MeToo प्रकरणात तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांच्या वादात राखी सावंत हिने उडी घेतल्यानंतर आता राखी विरुद्ध तनुश्री वादच जास्त रंगू लागलाय. तनुश्रीने राखी सावंतविरोधात 10 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकल्यावर आता राखी सावंतनेही तनुश्री दत्तावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. मात्र हा दावा करोडो रुपयांचा नाही तर चक्क 25 पैशांचा केलाय.

 

यावर आपली प्रतिक्रिया देताना तनुश्रीच्या आई-वडिलांना जास्त पैसे देऊ लागू नयेत, म्हणून आपण 25 पैशांचा दावा करत असल्याचं राखीने म्हटलंय. तसंच मी 50 कोटींचाही दावा तिच्यावर करू शकते, पण तनुश्रीची लायकी आपल्या लेखी केवळ 25 पैशांचीच असल्यामुळे आपण तिच्यावर 25 पैशांचा दावा करत असल्याचं राखी ने म्हटलंय.

तनुश्री दत्ता अत्यंत खालच्या पातळीवरची असून तिला आपल्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचा टोला राखी सावंतने लगावलाय. आपल्या आईबद्दल तनुश्रीने अपशब्द वापरले असल्यामुळे आपण तिला कोर्टात खेचत असल्याचं म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *