‘मंजुर-ए-खुदा’ गाण्यात कतरिनाच्या कातिल अदा!

ऐन दिवाळीमध्ये यशराज फिल्म्सचा बिग बजेट ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’ चित्रपट प्रदर्शित होतोय. या सिनेमातील सिनेमाची निर्मिती मूल्यं, तगडी स्टारकास्ट आणि स्पेशल इफेक्ट्स यांमुळे आधीच हा चित्रपट चर्चेत आहे. त्यात कतरिना कैफचं ‘सुरैय्या’ हे गाणं तिच्या हॉट मुव्ह्जमुळे चांगलंच लोकप्रिय झालं. म्हणूनच आता कतरिनाचं आणखी एक साँग प्रेक्षकांसमोर येत आहे. ‘मंजूर-ए-खुदा’ असे या गाण्याचे शब्द आहेत.

‘मुजूर-ए-खुदा’ मध्येही कतरिनाच्या कातिल अदा पाहायला मिळत आहेत. या गाण्यात कतरिनाने सोनेरी ड्रेस घातला आहे. मात्र हे केवळ आयटम-साँग कॅटेगरीतलं गाणं नसून या गाण्यातून साहसकथा सांगण्याचा प्रयत्न केला गेलाय. हे गाणं गायलं आहे सुखविंदर सिंग आणि श्रेय घोषल यांनी, तर या गाण्याला संगीत दिलंय अजय-अतुल या मराठी जोडगोळीने.

 

 

 

यशराज फिल्म्सने या गाण्याची झलक प्रसिद्ध केल्यावर नेटिझन्सनी मोठ्या प्रमाणावर गाणं ‘लाईक’ केलं आहे. या गाण्याला ‘व्हूज’ही मोठ्या प्रमाणावर मिळत आहेत. या गाण्याचं मेकिंगही यशराज फिल्म्सने प्रसिद्ध केलं आहे. या सिनेमात अमिर खान, अमिताभ बच्चन, फातिमा सना शेख, कतरिना कैफ अशी स्टारकास्ट आहे. दिवाळीचं औचित्य साधून प्रेक्षकांची गर्दी खेचण्यासाठी 8 नोव्हेंबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *