दिवाळीनिमित्त मुंबईकरांसाठी खुशखबर!

दिवाळी सणाला अवघे 2 ते 3 दिवसच राहिले आहेत त्यामुळे दिवाळीनिमित्त अनेकजण मुंबईसह आसपासच्या भागात खरेदीसाठी बाहेर पडत असल्याने त्यांच्या सुविधेसाठी बेस्टने जादा गाड्या सोडण्याचे ठरवले आहे. त्यामुळे 31 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबरपर्यंत 18 जादा बस सोडल्या जाणार आहेत. तसेच 9 नोव्हेंबरला . भाऊबीजनिमित्त 136 जादा बस सोडण्यात येणार आहेत.

या ठिकाणी सोडल्या जाणार जादा बसगाड्या 

  • दिवाळीपर्यंत दादरमधील वीर कोतवाल उद्यान-प्लाझा, दादर, वांद्रे, महात्मा फुले मार्केट, काळबादेवी, एपीएमसी मार्केट-वाशी आदी भागात 18 गाड्या सोडल्या जातील.
  • शहर, पूर्व-पश्चिम उपनगरे, मीरारोड, भाईंदर, मॅरेथॉन चौक (ठाणे), कोपरी (ठाणे), कॅडबरी जंक्शन (ठाणे), रेतीबंदर-कळवा, वाशी, नवी मुंबई, कोपरखैरणे, नेरुळ, ऐरोली, घणसोली गाव, सीबीडी बेलापूर या विविध बसमार्गांवर एकूण 136 जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत.

तसेच जास्त गर्दी असणाऱ्या बस थांब्यांवर आणि रेल्वे स्थानकाबाहेरील बसस्थानकांवर प्रवाशांच्या मदतीसाठी बसनिरीक्षकांची, वाहतूक अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *