अखेर नाशिकमधून जायकवाडीला आज पाणी सोडणार

नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमधून जायकवाडीला आज पाणी सोडण्यात येणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आज नाशिक आणि नगरमधून पाणी सोडलं जाणार आहे.

मात्र जायकवाडीसाठी पाणी सोडण्याच्या विरोधात नाशिकमध्ये आंदोलन सुरु आहे. यापूर्वीच अनेक संघटना आणि राजकीय पक्षांकडून आंदोलन सुरु आहे.

त्यामुळे धरणावर तसेच पाणी प्रवाहित मार्गावर चोख पोलीस बंदोबस्त असेल. त्याबरोबरच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. याशिवाय पाणी चोरी रोखण्यासाठी मार्गावरील वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे.

सकाळी 10च्या सुमारास गंगापूर आणि दारणा धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे. तसेच कोणीही पाणी अडवण्याच्या प्रयत्न केल्यास कारवाई केली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *