मराठवाड्याची तहान अखेर भागणार

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज सकाळी 8 वाजता निळवंडे धरणातून  जायकवाडीसाठी 4250 क्युसेक्स पाणी सोडण्यात आले. तर मुळा धरणातून 6000 हजार क्युसेक्सकने पाणी सोडण्यात आले. जायकवाडी धरणात पाणी सोडण्याला नगर, नाशिक जिल्ह्यांतून विरोध होत होता. मात्र पोलिसांच्या बंदोस्तात अखेर मराठवाड्याला हक्काचं पाणी मिळालं आहे.

निळवंडे धरणाच्या पाच मोरया मधून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात आले. आता निळवंडे धरणातून 3.85 टीएमसी पाणी जायकवाडी धरणात सोडण्यात आले असून सुरवातीला 6000 क्यूसेकने पाणी सोडण्यात आले आहे, नंतर 2 तासांनी 2000 क्यूसेक आणि पुन्हा 2 तासांनी 2000 क्यूसेक असे एकूण 10000 क्यूसेकने विसर्ग जायकवाडी धरणात सोडण्यात येणार आहेत. त्यानंतर 3 ते 4 दिवसांनी विसर्ग कमी होत जाणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे.

जलसंपदा विभागातर्फे आवाहन करण्यात येत आहे की सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असल्याने कुणीही आंदोलन करून विसर्गास अडथळा आणू नये. तसेच नदीतील प्रवाह जास्त असल्याने कुणीही नदीपात्रात उतरू नये. कुणाचे विद्यूत पंप जर नदीपात्रात असतील तर ते सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात यावेत. कठल्याही प्रकारची मालमत्ता अथवा जिवीतहानी झाल्यास जीवितहानी झाल्यास जलसंपदा विभाग जबाबदार राहणार नाही.

अहमदनगर पाटबंधारे विभागचे अधिकारी किरण देशमुख यांनी आवाहन केले असून प्रवरानदी काठील नागरिकांनाही सतर्क राहण्याचा इशाराही दिला आहे. निळवंडे धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात आल्याने प्रवरा आणि गोदावरी नदी काठच्या गावांचा दररोज 19 तास वीजपुरवठा खंडित राहणार असून पुढील 8 ते 10 दिवस पाणी सुरू राहणार असल्यामुळे नदी काठच्या गावांची दिवाळी अंधारात राहणार आहे.      

       

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *