विहिरीतला गाळ ठरला कर्दनकाळ

डोंबिवलीच्या खंबाळपाडा परिसरात ड्रेनेज साफ करण्यासाठी उतरलेल्या 3 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच कल्याण पूर्वेतही काहीसा असाच भयानक प्रकार घडला आहे.
कल्याण पूर्वेमधील नेतिवली भागात सफाईसाठी उतरलेले तीनजण बुडाल्याची घटना आज घडली. त्या तिघांचा शोध घेण्यासाठी उतरलेल्या दोन अग्निशमन दलाचे जवानही विहीरीत बुडल्याची बातमी समोर आली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.
काय घडलं नेमकं?
  • कल्याण पूर्वेतील चक्कीनाका परिसरात असणाऱ्या मंदिराजवळ ही विहीर आहे.
  • या विहिरीच्या सफाईसाठी दुपारी एकजण उतरला.
  • तो बराच वेळ होऊनही वर न आल्याने तिकडच्या परिसरातील राहूल गोस्वामी, गुणवंत गोस्वामी हे दोघे बापलेक जे भीमा शंकर मंदिराचे ट्रस्टी आहे. हे ही विहिरीत उतरले.
  • मात्र सफाई कर्मचाऱ्यांपाठोपाठ दोघेही बाहेर न आल्याने विहिरीत बुडाले.
  • याची माहिती महापालिका अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना दिल्यानंतर ते घटनास्थळी पोहचले.
  • त्यातील एका पाठोपाठ 2 अग्निशमन कर्मचारी विहिरीत उतरले मात्र ते खूप वेळ बाहेर न आल्याने ‘भयंकर विषारी गॅसमुळे त्यांना ही चक्कर आली आणि त्या गाळात ते ही अडकले की काय? असा अंदाज पोलिसांनी वर्तविला.
  • मात्र तेही त्या तलावात बुडाले होते.
  • शहीद झालेल्या अग्निशमन दलाच्या कर्मचार्याची नावे  अनंता  शेलार , प्रमोद वाघचौरे अशी आहेत.

याआधारे आता त्या पाच जणांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे तसेच घटनास्थळावरुन एक मृतदेह बाहेर काढण्यात आला असून उर्वरित चौघांचा शोध अद्याप सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *