‘स्टेच्यू आॅफ युनिटी’चा शिल्पकार मराठमोळा; पाटीवर मराठी भाषेलाच वगळले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. हा जगातील सर्वात उंच पुतळा साकारण्यासाठी मराठमोळ्या शिल्पकाराची मदत घेतली.

तसेच लोकार्पण सोहळ्यावेळी छत्रपती शिवरायांचे नावही मोदींनी घेतले, मात्र पुतळ्याच्या खाली देश-विदेशातील भाषांमध्ये लिहिलेल्या पाटीवर मराठीचा विसर पडल्याचे दिसत आहे. केवडीया येथे नर्मदा नदीवर सरदार वल्लभभाई पटेल यांचा 182 मीटर उंचीचा पुतळा उभारण्यात आला आहे. ‘ऐक्याचे प्रतीक’ असे या पुतळ्याचे वर्णन करताना मोदी यांनी शिवरायांशी तुलना केली.

मात्र गुजरातला मराठीचे वावडे असल्याचे दिसत आहे. हा पुतळा मराठमोळे शिल्पकार राम सुतार यांनी साकारला आहे. मात्र शेजारच्या राज्यातील मराठी भाषेचा समावेश नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. तसेच या पाटीमध्ये तमिळ आणि बंगाली भाषेतील नावही चुकले आहे. यापाटीवर एकूण 10 भाषा आहेत. मात्र यामध्ये मराठी भाषेचा समावेश नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *