महाबळेश्वरला जाताय… आधी ‘ही’ बातमी वाचा!

तुम्ही जर दिवाळीच्या सुट्टीमध्ये महाबळेश्वरला फिरायला जात असाल, तर तुमच्या आनंदावर विरजण टाकणारी एक बातमी आहे. महाबळेश्वर आणि पांचगणी येथील पर्यटकांना रपेट घडवून आणणाऱ्या घोड्यांवर पोलिसांनी बंदी घातली आहे.

महाराष्ट्रातल्या थंड हवेच्या ठिकाणांपैकी पर्यटकांच्या विशेष पसंतीचं असणाऱ्या महाबळेश्वर येथे आता पर्यटकांना घोड्यांवरून फेरी मारता येणार नाही. तसंच घोड्यांवर बसून फोटोही आता काढता येणार नाहीत. यामुळे वर्षानुवर्षं घोड्यांच्या या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या लोकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

काही दिवसांपूर्वी महाबळेश्वरमधील टेबललँड येथे घोड्यावरून पडून एका पर्यटकाचा मृत्यू झाला. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेचा विचार करून पोलिसांनी येथील घोड्यांवर बंदी आणली आहे. मात्र यामुळे घोडे व्यावसायिकांबरोबरच पर्यटकांमध्येही मोठ्या प्रमाणावर नाराजीचं वातावरण आहे. तसंच अनेक स्थानिक नेत्यांनीही पोलिसांच्या निर्णयाला विरोध केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *