जियो धनधनाधन…

रिलायन्स जियोने आपल्या एंट्रीने देशातील टेलीकॉम बाजारचा चेहराच बदलून टाकला. जिओच्या भरमसाठ आॅफर्सने लोकांना भारावून टाकले आहे. फ्रीमध्ये इंटरनेट आणि देशभरात केले जाणारे कॉल्स पण निशुल्क या प्लान्समुळे जियो काही दिवसांतच लोकांचा आवडीचा नेटवर्क बनला.

त्यातच रिलायन्स जियोने आपला नवीन तिमाही रिपोर्ट सादर करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. रिलायंस जियो ने सांगितले की फक्त 25 महिन्यांत जियोने 250 मिलियन म्हणजे 25 कोटी लोक आपल्या नेटवर्कशी जोडले आहेत. 

रिलायन्स जियोचे चेअरमन मुकेश अंबानीने याबाबतची माहिती शेअर केली आहे. आपल्या सुरवातीपासून आतापर्यंत गेल्या 25 महिन्यात 250 मिलियन यूजर्सचा बेस मिळवला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *