अखेर151 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर!

महाराष्ट्रात यंदा कमी पाऊस पडल्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्यासाठी पाणी आणि गुरांना चारा यांची समस्या शेतकऱ्यांपुढे उभी आहे. खरीपाची पिकं पावसाआभावी वाया गेली आहेत. त्यामुळे सरकारने दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी सातत्याने होऊ लागली आहे.

यापूर्वी 180 तालुक्यांमध्ये सरकारने दुष्काळसदृश परिस्थितीची घोषणा केली होती. मात्र सरकारने दुष्काळ जाहीर करावा यासाठी विरोधकांनी आणि जनतेने मागणी केल्यानंतर सरकारने अखेर 151 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे.

महाराष्ट्र सरकारने अखेर 26 जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला असून 151 तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित केला आहे. यातल्या 112 तालुक्यांमध्ये गंभीर दुष्काळ तर 39 तालुक्यांध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला आहे.

 

maha1.jpg

 

maha2.jpg

 

maha3.jpg

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *