बचतगटांच्या महिला थेट अमेरिकेतील ‘फेसबुक’, ‘व्हॉट्सअॅप’च्या कार्यालयात

राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी अमेरिकेतील सॅन फ्रॅन्सिस्को येथे बचतगटांच्या महिलांसमवेत फेसबुक मुख्यालय, व्हॉट्सअॅप प्रतिनिधी आणि टीआयई संस्थेला भेट दिली. ग्रामीण बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंना जागतिक बाजारपेठ मिळण्यासाठी या दोन्ही माध्यमांचा वापर प्रभावीपणे करण्यासाठी महाराष्ट्र सरकार सोबत काम करण्याचे आवाहन त्यांनी केलं.

टीईआयच्या मदतीने महाराष्ट्रातील महिला आणि युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याकरता संयुक्त भागिदारी करण्याबाबत पंकजाताई मुंडे यांनी त्यांच्या प्रतिनिधींसमवेत चर्चा केली. राज्यात ‘उमेद’ आणि ‘माविम’च्या माध्यमातून तसंच ‘दीन दयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजने’च्या माध्यमातून होत असलेल्या रोजगार निर्मितीच्या कामाची त्यांनी माहिती दिली.

fb2.jpg

 

बचतगटांनी तयार केलेल्या भारतीय वस्तूंचे नमुने त्यांनी अमेरिकन लोकांना दाखवले. उपस्थित प्रतिनिधींना त्या वस्तू एवढ्या आवडल्या की त्यांनी तिथेच त्या खरेदीही केल्या. तांब्याच्या एका बाटलीला २१०० रू. तर ‘वारली पेंटींग’ला तब्बल ७२१० रूपये महिलांना मिळाले. बघता बघता पंधरा मिनिटांत सुमारे ३५ हजार ७०० रूपयांची विक्रीही यावेळी झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *